
सानेगाव यशवंतखार हायस्कूलच्या इमारतीचेआमदारअनिकेत तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.
खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून 72 लाखाचा निधी मंजूर.
रोहा/प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील दीनाभाई मोरे शिक्षण मंडळ सानेगाव संचलित साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार हायस्कूल साठी खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नातून सुमारे 72 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून सदर इमारतीचे भूमिपूजन विधान परिषद आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे जिल्हा चिटणीस नंदू शेठ म्हात्रे राष्ट्रवादी नेते मनोज कुमार शिंदे उपसभापती संजय मांडलुस्कर राजेंद्रजी पोकले अनंतराव देशमुख, संदीप चोरगे ,संतोष भोईर,विवेक मोरे,मयूर खैरे,श्री यशवंत खराडे, राजू मोरे ,मोहन ठाकूर ,आदी मान्यवर उपस्थित होते.सानेगाव सारख्या ग्रामीण भागात ज्या काळामध्ये शिक्षणाची सुविधा नव्हती. त्यावेळी शिक्षण महर्षी दिनाभाई मोरे यांनी हे हायस्कूल सुरू करून खऱ्या अर्थाने या भागात शिक्षणाची गंगा आणली.व आज या ठिकाणी विद्यार्थीवर्ग शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून ज्या काही सोयी सुविधा आवश्यक असतील त्या उपलब्ध करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी दिले. जनाबाई मोरे शिक्षण प्रसारक मंडळ हे साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार हायस्कूल चालवत आहे. या ठिकाणी अनेक गोरगरीब मुलांनी शिक्षण घेतले आहे. स्थानिक कमिटी या हायस्कूल कडे जातीने लक्ष घालत आहेत. तर या हायस्कूल साठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे मंत्री आदितीताई तटकरे, व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्यामार्फत वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. गेले कित्येक वर्ष हायस्कूल साठी निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्यांचे या शिक्षण संस्थेवर अनंत उपकार असल्याचे नंदूशेठ म्हात्रे यांनी सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे उपाध्यक्ष बाळू पाटील मनोहर मोरे विवेक मोरे, जगन्नाथ ठाकूर, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र मोरे राजेश वाघमारे मुख्याध्यापक नितीन गोरीवले. यांनी अथक परिश्रम घेतले.
