
प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख पदी निवड.
रोहा.प्रतिनिधी. महेश मोहिते.
रोहा शहरातील तरुण आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना ( शिंदे गट )शहर प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीमुळे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह विशेषत तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले कित्येक महिन्यांपासून रोहा शहर प्रमुख पद रिक्त होते.
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते व पालकमंत्री भरतशेट गोगावले तसेच आमदार महेंद्र शेट दळवी यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व रायगड लोकसभा मतदारसंघ प्रमुख अनिल नवगणे आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली.
प्रकाश कोळी यांनी या पुर्वी रोहा नगर परिषद शिक्षण मंडळ तसेच विविध पदांवर जिद्द आणि चिकाटीने कार्य केले आहे.त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
दरम्यान या नियुक्ती बद्दल शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी नवनिर्वाचीत रोहा शहर प्रमुख शिवसेना ( शिंदे गट) प्रकाश कोळी म्हणाले पक्षनेतॄत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन.दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून रोहा शहरात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहिन.
