





रोहा धाटाव एमआयडीसी सर्वात सुरक्षित व हरित इंडस्ट्री पत्रकारांच्या स्नेह मेळाव्यात बारदेसकर साहेबांचे प्रतिपादन
रोहा प्रतिनिधी शैलेश गावंड
१७ जुलै रोजी रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन तर्फे धाटाव येथील आरआयए सभागृहात पत्रकारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते या वेळी असोसिएशन चे अध्यक्ष पी पी बार्देस्कर साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले इतर एमआयडीसी पेक्षा रोहा धाटाव एमआयडीसी ही सर्वाधिक वृक्ष संपदा असलेली हरित MIDC आहे तसेच येथील अपघातांचे प्रमाण सुद्धा इतरांच्या तुलनेत खूप कमी आहेलघु व मध्यम औद्योगीकरणामुळे विकासाला चालना मिळून राहणीमान सुधारते. या कार्यक्रमाला तालुका भरातील अनेक पत्रकारांनी उपस्थिती लावली यावेळी उपस्थित पत्रकारांना सुपारी ची रोपे भेट म्हणून देण्यात आली तसेच स्नेह भोजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सूत्रसंचालन पराग फुकणे यांनी केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नांदगावकर साहेब,देशमुख साहेब कोळेकर साहेब व अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
