


पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळवी म्हणून खास.सुनील तटकरे यांनी घेतली आढावा बैठक
रोहा प्रतिनिधी .( महेश मोहिते )
सोमवार पासून मदत वाटप सुरू करून पुढील ४ दिवसात मदत वाटप प्रक्रियेचा निपटारा करण्याचे निर्देश खा.तटकरे यांनी दिले.विमा कंपन्यांना कडून पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी असहकार्याची भूमिका घेतली जात आहे. या विमा कंपन्यांना देखील खा.तटकरे यांनी धारेवर धरले. गैर वाजवी पंचानामे होणार नाही मात्र एकही पूरग्रस्त व्यक्ती शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आदेश खा.सुनील तटकरे यांनी दिले. महापुरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे,मदत वाटप व रस्ते,पाणी,वीज, कृषी,व्यवसाय विमा मदत इत्यादी विषयी व आजवर झालेल्या कामांची माहिती जाणून घेण्यासाठी रोह्यात शनिवारी सायंकाळी खा.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे,आमदार अनिकेत तटकरे,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जि.प.उपाध्यक्ष मधुकर पाटील,प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सभापती विजया पाशिलकर,उपसभापती संजय मांडलुस्कर,नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपाध्यक्ष अहमद दर्जी,विजय मोरे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके,नायब तहसीलदार राजेश थोर, विनोद पाशिलकर आदी जण उपस्थित होते. यावेळी नुकसानीचे प्रलंबित पंचनामे २४ तासात पूर्ण करावे.यंदा भूस्खलन घटनेचे प्रमाण वाढले आहे. व्यावसायिकांना मदत मिळवून देण्यासाठी इन्शुरन्स कंपनीने फारसा कागद पत्रांची सक्ती करू नये.विमा काढताना जे पेपर जमा केले गेले तेच पेपर घेऊन व्यापारी बांधवांना मदत करावी अशी तंबी देखील खा.तटकरे यांनी दिली. या बैठकीत सोमवार पासून नागोठणे वाकण आदी भागात पूरग्रस्तानांना मदत वाटप सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिले.पूर परिस्थिती बचाव पथकाद्वारे होणाऱ्या कामात आढतळा निर्माण होऊ नये म्हणून रोहा आणि नागोठणे येथे बोट उपलब्ध करून देणार तसेचप्रत्येक पूरग्रस्तांचे पंचनामे होणार आहेत. एकही पूरग्रस्त मदती पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासना कडून घेण्यात येईल. तालुक्यातील दरड गावांचे पुन्हा सर्वेक्षण करणार अशी माहिती जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिली. नैसगिर्क आपत्ती आल्यानंतर बचाव कार्य करणाऱ्या तरुणांचा शासकीय विमा असणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जावे. या महापुरात वीज वितरण कंपनीचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाली आहे. त्यामुळे संबधित अधिकारी वर्गाने नुकसान अहवाल सादर केल्यास शासन दरबारी विशेष निधी उपलब्ध करून पुरातील नुकसानी व जुन्या जीर्ण झालेल्या इलेक्ट्रिक साहित्य बदली करून त्या एवजी नवीन साहित्य खरेदीला शासना कडून मंजुरी देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असणार अशी माहिती आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली. फोटो कॅप्शन : रोहा येथे आयोजित आढावा बैठकीत माहिती देताना खासदार सुनील तटकरे समवेत आम. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी मान्यवर
