
सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे’ च्या माध्यमातून वैती परिवाराच्या वतीने आदिवासी आश्रम शाळा चिरनेर येथे शैक्षणिक साहित्य वाटप
पनवेल रायगड ( सुरेश तांडेल )
माणुसकीची साथ मदतीचा हात! हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेऊन समाजातील गोरगरीब अनाथ मुलांना मदतीचा हात देण्याच्या व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने, समाजसेवेची आवड असणारे व सुरवातीपासून समाजसेवेत सक्रिय असणारे उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील समाजसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य समीर म्हात्रे यांनी २२ ऑगस्ट २०२३ रोजी स्थापन केलेल्या ‘सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे’ या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप,मोफत शिकवणी वर्ग, रक्तदान शिबीर,आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी साहित्य वाटप,अनाथ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत,सामाजिक संस्थांना पुरस्कार,वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेच्या या सामाजिक कार्याची प्रसारमाध्यमांद्वारे दखल घेऊन समाजसेवेची असलेली तळमळ यामुळे प्रेरित होऊन वैती परिवाराने आपल्या निवासस्थानी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात आणण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला भाविकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर वह्या,पेन, पेन्सिली तसेच इतर शैक्षणिक साहित्य जमा केले. भाविकांच्या सहकार्याने संकलित झालेले हे सर्व शैक्षणिक साहित्य रविवार,दि. १२ जुलै २०२६ रोजी चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य अशा उपक्रमांसाठी मुलुंड येथील वैती परिवारातील भावेश अनिल वैती,सोनी भावेश वैती,चेतन सुनील वैती तसेच आदिवासी आश्रम शाळा चिरनेरचे मुख्याध्यापक श्री.मोरे सर,संस्थेचे सदस्य पद्माकर पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश तांडेल (कासरभट) यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.या सहकार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी त्यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानले..
