संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवी दिली, पण ही शिवी पत्रकारांच्या ताकदीचीच पावती आहे.
रोहा:प्रतिनिधी
आजच्या काळात सत्तेचा प्रभाव किती वाढला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आमदार, खासदार, अधिकारी, यंत्रणा सगळ्यांवर सत्तेची छाप दिसते. स्वतः आमदार साहेबच म्हणतात की, कमिशनर सुद्धा माझं वेडंवाकडं करू शकत नाही. मग बाकी परिस्थिती काय असेल याचा अंदाज जनतेनेच लावावा. अनेक जण सत्तेसमोर झुकले, अनेकांनी तडजोड केली, पण या सगळ्या काळात पत्रकार अजूनही लोकांचे प्रश्न घेऊन ठामपणे उभा आहे.कारण जेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांनी सत्ताधाऱ्यांचा संयम सुटतो, राग अनावर होतो आणि तोंडातून शिवीगाळ बाहेर पडते, तेव्हा समजून घ्यायचं की प्रश्न नेमका वर्मी लागला आहे. पत्रकार अजूनही भ्रष्टाचार, अन्याय आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत, म्हणूनच काहींना त्यांची भीती वाटते.सत्ता अनेकांना विकत घेऊ शकते, अनेकांना गप्प बसवू शकते, पण पत्रकारांना विकत घेणं आणि त्यांचा आवाज दाबणं अजूनही शक्य झालेलं नाही, हेच या घटनेतून दिसून येतं.आणि संजय दीना पाटील यांच्यासारख्या खासदाराकडून सुसंस्कृत भाषेची अपेक्षा ठेवायची तरी कशासाठी? जनतेच्या प्रश्नांना उत्तर नसले की काही लोकांकडे शिवीगाळ हाच शेवटचा पर्याय उरतो. पण पत्रकार प्रश्न विचारणं थांबवणार नाहीत, कारण ते कोणत्याही नेत्याचे नाहीत, तर जनतेचे प्रतिनिधी आहेत.
