नवी मुंबई पोलिसांचा आणखी एका स्पा सेंटरवर थरारक छापा
! नवी मुंबई – अमुलकुमार जैन
नवी मुंबई पोलिसांच्या AHTU कशाने वाशी येथील एका स्पा सेंटरवर धाड टाकून अवैध देहव्यापार प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत स्पा सेंटर चालवणारी एक महिला संचालिका आणि एका व्यवस्थापकाच्या मुसक्या आवळल्या असून, २ महिलांची सुटका केली आहे. पोलिसांना संबंधित स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत स्पा सेंटरवर छापा टाकला.कारवाईदरम्यान तेथे अवैध धंदे सुरु असल्याची खातरजमा झाली. यावेळी टाकण्यात आलेल्या धाडीत २ महिलांची सुटका करण्यात आली. प्राथमिक तपासात या महिलांना स्पा सेंटरमध्ये बॉडी मसाजच्या कामासाठी ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडून अनैतिक कृत्ये करून घेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणी स्पा सेंटरच्या संचालिका सविता संतोष जैसवाल वय ४० वर्ष आणि व्यवस्थापक विनायक लहू कावले वय ३० वर्ष यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असून, या रॅकेटशी संबंधित आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
