
दौंडमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार ; महिला सरपंचांना राजमाता अहिल्यादेवी होळकर जयतींचा विसर, नागरिकांमधून संताप
दौंड प्रतिनिधी –
दौंड तालुक्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायत महिला सरपंचांना माञ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे साजरी केली जाते. परंतु पाटस येथील ग्रामपंचायत कार्यालयात फक्त आजी माजी सदस्य व सरपंच यांच्या मुलाचा समावेश होता. दरवर्षी शासनाच्या सूचनांनुसार महापुरुषांच्या जयंतीनिमित्त संबंधित कार्यालयांत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश असतो. मात्र, पाटस ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच असूनही प्रत्यक्ष हजर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजमाता आहिल्यादेवींचे सुशासन आणि समाजकल्याण कार्य पाहाता, महिला सरपंचांकडून हा विसर पडल्याने स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये रोष व्यक्त होणे साहजिकच आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा प्रसार हा शासकीय यंञणेचीही जबाबदारी माणली जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या जयंती सारख्या महत्त्वाच्या दिवसाकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महापुरुषांच्या जयंती केवळ औपचारिकतेपुरत्या न ठेवता त्यांच्या विचारांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु किमान जयंतीदिनी उपस्थित न राहने ही खेदजनक बाब आहे. संबंधित महिला सरपंचांवर जबाबदारी निश्चित करुन स्पष्टीकरण मागवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
