


युवानेते आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा प्रतिनिधी राकेश शेडगे
रोहा शहरातील उभरते युवानेते आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजाप्रती बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक संदेश दिला. यावेळी रक्तदानासोबत वृक्षारोपण व अन्नदान उपक्रमही राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन व समाजसेवेचा संदेश देणारे हे उपक्रम विशेष आकर्षण ठरले.सामाजिक कार्यातून युवकांनी पुढे येत समाजासाठी योगदान द्यावे, असा संदेश यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांचे नागरिकांनी कौतुक केले.या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, उपजिल्हाप्रमुख युवासेना नेते रितेश मुंडे शिवसेना नेते अशोक धोत्रे, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली सदावर्ते, राकेश शेडगे, बबलू मोरे,नारायण खुळे.राहुल गुरव.रोहा येथील शिवसेना कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
