
रोहा रेल्वे क्रॉसिंग वरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम संथगतीने(प्रचंड त्रासामुळे प्रवासी वर्ग बेजार.)
रोहा प्रतिनिधी .(महेश मोहिते)
रोहा नागोठणे आणि अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रोहा अष्टमी रेल्वे क्रॉसिंग वरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेली तीन वर्ष संथगतीने सुरू असल्याने या परिसरातील नागरिक अक्षरश: या खराब रस्त्यावरून प्रवास करताना वैतागले आहेत.यंदाच्या पावसाळ्यात मात्र रस्त्याची परिस्थिती पाहता खूप मोठे हाल होणार असे चित्र दिसत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्षच करीत असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.रस्त्यावरून जात असताना प्रचंड त्रासामुळे प्रवासी वर्ग अक्षरश बेजार झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याची व्यवस्थित डागडूजी करावी अशी मागणी होत आहे. रोहा नागोठणे रस्त्यावर अष्टमी येथे रेल्वे क्रॉसिंग असल्याने सततच्या रेल्वेच्या फेऱ्या वाढल्याने सातत्याने गेट बंद त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.जानेवारी २०२३ मध्ये खा.सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी ६५ कोटी निधीचे उड्डाणपूल मंजूर झाले.त्याचे उद्घाटन सुद्धा झाले रेल्वे कडून ५० टक्के निधी व राज्य सरकारकडून ५० टक्के निधी अशी तरतूद करण्यात आली होती.सदर काम हे एका वर्षात पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते.मात्र तीन वर्ष होत आले तरी देखील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होऊ शकला नाही. या ठिकाणी सुरुवातीला आलेले ठेकेदार मदिना इन्फ्रा यांनी अचानक काम सोडून दिले.नंतर मदानी इन्फ्रा यांनी काम घेतले दोन वर्ष काम केले त्यानंतर ही कंपनी सुद्धा गायब झाली.आता व्हीएसआर या कंपनीने रेल्वे उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे.त्याचे काम सुरू आहे.मात्र काम संत गतीने सुरू आहे या पावसाळ्यात देखील हे काम पूर्ण होऊ शकणार नाही अशी वस्तुस्थिती आहे.या ठिकाणच्या रस्त्याची परिस्थिती दयनीय झाली आहे.पावसाळ्यात तर खूपच परिस्थिती भयानक होणार आहे.या ठिकाणी गेल्या वर्षी अनेक अपघात झाले आहेत.अनेकांचे जीव गेले आहेत.त्यामुळे यावर्षी तरी पावसाळ्यापूर्वी संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे काम पूर्ण करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. एका वर्षात होणारे हे काम तीन वर्ष सुरू आहे.ठेकेदार बदलले गेले आहेत.ठेकेदार टिकत नाहीत.नक्की प्रकार काय?अशी चर्चा सुद्धा या रेल्वे उड्डाणपुलाबाबत सुरू आहे.खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे उड्डाणपुलाला निधी आणला खरा मात्र संबंधित प्रशासन हे काम पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.आता सध्याची राजकीय परिस्थिती व सरकारची परिस्थिती पाहता हे काम लवकर पूर्ण होईल की नाही यात तर्क वितर्क लढविले जात आहेत.संबंधित ठेकेदारांनी प्रवाशांचा विचार करून रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
