
किनवटच्या डिजीटल बोर्ड ची मुकनायक नॅशनल अवाॅर्ड ने घेतली दखल.युवा उद्योजक आशिष शेळके यांना मुकनायक नॅशनल अवाॅर्ड 2026 ने सम्मानित.किनवट : किनवट चे व्हिआयपी म्हणून प्रसिद्ध असलेले युवा उद्योजक तथा व्हिआयपी रीयल इस्टेट व व्हिआयपी ऑफिस चे संचालक आशिष शेळके यांना मुकनायक नॅशनल अवाॅर्ड 2026 ने दिनांक 18 मे 2026 रोजी, यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. युवा उद्योजक आशिष शेळके यांनी नुकतेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त स्वखर्चातून किनवट मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचे एक आकर्षक डिजीटल बोर्ड बनवले होते जे की नांदेड जिल्ह्यातील प्रथमच डिजीटल बोर्ड होते, तसेच अशा प्रकारचे विविध सामाजिक कामे, सामाजउपयोगी कार्यक्रमे, वंचितांना तथा गरजुंना सहकार्य करणे, अशाप्रकारचे विविध कार्ये ते व्ययक्तीक तथा त्यांच्या आशिष सेवाभावी संस्थे मार्फत वेळोवेळी करत असतात. या त्यांच्या सर्व कामांची दखल मुकनायक नॅशनल अवाॅर्ड 2026 ने घेऊन त्यांना सन्मानित केल्यामुळे सर्वच स्तरांतून अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव होतो आहे. आशिष शेळके यांनी सर्व आयोजकन टिम, संयोजन टिम, मान्यवर आणि शुभचिंतकांचे आभार मानुन, या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी नविन उर्जा व प्रेरणा मिळेल असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेमंत पाटील (विधानपरिषद सदस्य तथा अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य) यांना निमंत्रित केले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. साध्वी धर्मसिंहनी गायत्री दिदि (किर्तनकार), मा. पंढरीनाथ कोकारे (ज्येष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष नानक साई फाऊंडेशन), शिवा कांबळे (राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त शिक्षक, नांदेड), मा. सौ. मिनाक्षी सुधाकर शिंदे, मा. विनायक देशमुख, इत्यादी बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सामाजिक क्षेत्र, पत्रकार क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र इत्यादी अशा विविध क्षेत्रातील एकुण 53 जनांना या अवाॅर्ड नी सम्मानित करण्यात आले अशे कार्यक्रमाचे आयोजक शंकरसिंह ठाकुर व मारोती शिकारे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
