




माणगाव तालुक्यात असलेले कांदळगाव खुर्द ह्या गावात दिनांक 15/05/2026 रोजी रात्री 3:00 वाजता गाडी नंबर MH06BG4663 ह्या गाडीत बेकायदेशीर रित्या खैराचे झाड तोडून ठेवलेली ही गाडी गावाच्या हद्दीत उभी होती. तरी तेथील एक रहिवाशी श्री सिद्देश जाधव याच्या निदर्शनास आली त्याने गाडीचे व नंबर प्लेट चे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग घेतले पोलिसाना 101 नंबर वर कॉल केला आणि बोलाविले त्यांनी ती गाडी पोलिसांना जमा करायला लावली व कारवाई करायला लावली श्री सिद्धेश हा मुलगा याच गावात राहतो कामावरून आल्यावर त्याचे टेम्पो कडे लक्ष गेले टेम्पो ची पाहणी केली त्या वेळी त्याला हा टेम्पो इथे कसा कांय हा प्रश्न पडला व त्या मध्ये खैराची लाकडे आहेत हे दिसताक्षणी त्याने लगेच उशीर न करता पोलिसाना कॉल केला सिद्धेश हा मुलगा हुशार आणि हिम्मत वाला दिसला जागरूक नागरिक म्हणून त्याने लगेच पोलिसाना कॉल केले ड्युटी वर असणारे पोलीस कर्मचारी राकेश गाडे आणि अभिषेक अस्वले यांना कारवाई करायला सांगितली आहे पोलिसांनी आरोपी संदीप शांताराम जाधव याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाई माणगांव पोलीस स्टेशन येथे सुरु आहे.
