


भातसई येथे महादेवी उत्सवात पारंपरिक गळ टोचण्याच्या कार्यक्रमास भाविकांची प्रचंड गर्दी
रोहा (शैलेश गावंड)
रोहा नजीकच्या भातसाई या गावा मध्ये दरवर्षी प्रमाणे या वेळी सुद्धा दिनांक १ एप्रिल रोजी महादेवी आणि श्री धावीर महाराज यांच्या उत्सवा निमित्त यात्रा भरली होती यावेळी काही भक्त गण पाठी ला लोखंडी गळ टोचून घेतात त्यातील एका भक्त गणा ला सुमारे दोन मजले उंची वरील एका आडव्या लाकडी खंबा ला लटकून एक फेरी मारली जाते या पूर्वी पाच फेऱ्या मारल्या जात असत आश्चर्य म्हणजे दोन लोखंडी गळ पाठी मधे टोचून सुद्धा जराही रक्त येत नाही आणि कोणताही त्रास जाणवत नाही त्या मुळे हा चमत्कार पाहण्या साठी लांबून लांबून भक्तगण या उत्सवास गर्दी करीत असतात
या वेळी सुद्धा खूप गर्दी झाली होती अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून हा उत्सव मंदिर कमिटी आणि ग्रामस्थानी पार पडला
