
माजी ग्रामसेवक दीपक दाजी चिपळूणकर यांचे दुःखद निधन
रोहा (शैलेश गावंड)
निवि येथील रहिवासी व माजी ग्रामसेवक दीपक चिपळूणकर यांचे वयाच्या 59 व्या वर्षी दिनांक 26 मार्च रोजी दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
रोहा तालुक्यातील धाटाव व अन्य ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी ग्रामसेवक म्हणून यशस्वीरित्या सेवा बजावली मनमिळाऊ स्वभाव आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी सर्वत्र आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता व विस्तार अधिकारी हे बढती चे पद सुद्धा भूषवले होते त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना काही पुरस्काराने गौरवण्यात सुद्धा आले होते ते वृक्ष प्रेमी होते झाडाझुडपांची त्यांना आवड असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली ते सतत वृक्ष लागवड करीत असत त्यांच्या अक्षय लॉन या फार्म हाऊसचा परिसर सुद्धा त्यांनी हिरवागार करून ठेवला आहे गेले काही महिने ते आजारपणाशी झुंज देत होते ते स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आणि अध्यात्मिक वृत्तीचे होते अखेर गुरुवारी रामनवमीच्या दिवशी मृत्यू ने त्यांना गाठले त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या कर्तृत्वावन पत्नी दीपिका ताई चिपळूणकर तसेच एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी ४ एप्रिल रोजी उद्धर पाली येथे होणार असून दिनांक ७ एप्रिल रोजी उत्तर कार्य राहत्या घरी निवि येथे होणार आहे
