
१ फेब्रुवारी रोजी योग व आरोग्य संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन
संजीव भांबोरे
पनवेल -योग व आरोग्य क्षेत्रातील अभ्यासक, साधक व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योग व आरोग्य संदर्भ ग्रंथालयाचे भव्य उद्घाटन रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या योग व आरोग्य विषयावरील विविध ग्रंथांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या ग्रंथालयात योगशास्त्र, नैसर्गिक उपचार, आहार-विहार, मानसिक आरोग्य, जीवनशैली सुधारणा आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण व संदर्भात्मक पुस्तके उपलब्ध असून, हे ग्रंथालय आरोग्याबाबत जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आयोजित ग्रंथप्रदर्शनामुळे वाचकांना विविध लेखकांची व संशोधकांची पुस्तके एकाच ठिकाणी पाहण्याची तसेच अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमास योगप्रेमी, आरोग्य विषयक अभ्यासक तसेच नागरिकांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
