


श्री बबन शांताराम मोहिते यांची (पिंगळसई ) तंटामुक्ती अध्यक्ष बिनविरोध निवड.
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
आज दिनांक ३१/ ८ /२०२६ रोजी झालेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आणि सर्वानुमते रोहा तालुका नाभिक समाजाचे कार्याध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य श्री बबन शांताराम मोहिते यांची पिंगळसई ग्रामपंचायतीच्या बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल पिंगळसई नाभिक समाज वतीने जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी मा.सरपंच श्री सोपानराव मोहिते.श्री किरण मोहिते.श्री चंद्रकांत मोहिते.श्री मिलिंद मोहिते.पोलीस पाटील श्री संतोष मोहिते.श्री सतिष मोहिते.श्री कॄष्णा कदम श्री सुनील पवार.श्री रविंद्र मोहिते.श्री विलास शिंदे.श्री शेखर मोहिते.श्री राजेश मोहिते.कु विनय शिंदे व समाज बांधव उपस्थित होते.
