

रोहा नगरपरिषदेची वचनपूर्ती,रोहिदास नगर जलवाहिनीचे भूमिपूजन,विकासाला चालना मिळणार, स्थानिकांना विश्वास
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते
रोहा अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दरम्यान अष्टमी प्रभाग 1 मधील नव्याने विकसित होत असलेल्या रोहिदास नगर भागात कमी व अनियमित पाणीपुरवठा समस्या जाणवत होती. प्रचारा दरम्यान येथील नागरिकांनी आपली कैफियत नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या कडे मांडली होती. त्यावेळी निकाला नंतर खा. सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शन व ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचे नेतृत्वाखाली ही समस्या नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन देत आज ती वचनपूर्ती टिम नगरपरिषदेने केली. नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे,उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गटनेते महेंद्र गुजर, पाणीपुरवठा सभापती मयुर दिवेकर, सभापती नीता हजारे,नगरसेविका पूर्वा मोहिते, माझ सवाल, जेष्ठ नेते सुभाष राजे, कॅप्टन प्रसाद तेलगे,समीक्षा बामणे, अकिफ येरुणकर, वसंत कोठारी, राहुल भोबड,ठेकेदार विकास शिंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
रोहा अष्टमी नगरपरिषद मधील रेल्वे स्टेशन पलीकडे रोहिदास नगर भागात नव्याने नागरी वस्ती वाढत आहे. या भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही रेल्वे फाटक उड्डाणंपुल काम होत असताना अनेक ठिकाणी तोडण्यात आली. यामुळे येथील नागरिकांना कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा या समस्येला सामोरे जावे लागत होते. निवडणूक प्रचारात नागरिकांची ही समस्या जाणून त्यावर तातडीने पर्यायी व्यवस्था करू असे आश्वासन स्थानिक प्रतिनिधी नीता हजारे, प्रशांत कडू यांनी दिले होते. स्वतः नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापती ही समस्या जाणून असल्यामुळे त्यांनी खा. सुनिल तटकरे, ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचे वेळोवेळी याकडे लक्ष वेधले. पुलाचे काम होत असताना नागरिकांच्या जीवनावश्यक गरजेची यंत्रणा नादुरुस्त झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग, पुलाचे काम करणारे ठेकेदार यांचे निदर्शनास आणून ती पुन्हा उभारण्यास सहकार्य करावे अशी मागणी केली. त्यानुसार आता नव्याने ही जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.निवडणूक निकाला नंतर सहा महिन्यात हे काम सुरु झाल्यामुळे नागरिकांचे मधून समाधान यापुढे विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
