
रोहा तालुक्यात राजकीय भूकंप
रोहा.प्रतिनिधी.महेश मोहिते.
शिवसेना शिंदे गटाचे ॲड.मनोजकुमार शिंदे यांनी हाती घेतले घड्याळ.
खासदार सुनीलजी तटकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.
रोह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना घडली असून शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख ॲड.मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) मध्ये असंख्य कार्यकर्तेसह जाहीर प्रवेश केला.खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला.यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे तटकरे साहेब कोणती जवाबदारी देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.यामुळे रोहा तालुक्यातील राजकारणाला एक नवे समीकरण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
