
खा. तटकरे साहेबांचा वाढदिवस स्व. अजितदादा पवार यांना अभिप्रेत असेच समाजोपयोगी उपक्रम घेत साजरा करणार:-
कार्याध्यक्ष समीर शेडगे.महिला आरोग्य तपासणी, शालेय क्रीडा महोत्सव,पौष्टिक पाक कला स्पर्धा, अपंग स्टॉल वितरण यांचे आयोजन
रोहा प्रतिनिधी:- महेश मोहिते
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या दुर्दैवी अपघाती निधनातून आजही राष्ट्रवादी चा कोणताही कार्यकर्ता सावराला नाही. पण दादा हयात असताना मी जसा अहोरात्र सर्वसामान्य जनतेची कामे करतो तसे माझ्या कार्यकर्त्यांनी करावी असा संदेश ते प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून व कृतीतून कार्यकर्त्यांना देत होते. यावेळी दादांच्या अकाली निधनामुळे माझा वाढदिवस साधेपणात साजरा करावा अशी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय खा. सुनिल तटकरे यांची सदिच्छा होती. पण दादांना अभिप्रेत असे उपक्रम राबवत आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू अशी इच्छा प्रत्येक रोहा तालुका, शहर पदाधिकारी कार्यकर्ता यांनी व्यक्त केली. त्यानुसार 10 जुलै रोजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या आठवड्यात महिला आरोग्य तपासणी, शालेय क्रीडा महोत्सव, पौष्टिक पाक कला स्पर्धा, अपंग व्यक्ती स्टॉल वाटप, शालेय विद्यार्थी छत्री वाटप, दमखाडी शाळा दुरुस्ती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये रोहा अष्टमी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी पत्रकार परिषद घेत केले आहे. रोहा अष्टमी शहर कार्यालय येथे घेतलेल्या या पत्रकार परिषद प्रसंगी रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, नीता हजारे, रवींद्र चाळके, उपसभापती गौरी बारटक्के, नगरसेविका पूर्वा मोहिते, स्वप्नील धनावडे, प्रेषित बारटक्के, युवक शहर अध्यक्ष सागर भोबड आदी पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष,रायगड चे खा. सुनिल तटकरे यांचा 10 जुलै रोजी 72 वा वाढदिवस आहे. यावेळी खा. तटकरे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना मोलाची साथ लाभलेले त्यांचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांचे अकाली निधनाच्या धक्यातून त्यांच्यासह राष्ट्रवादी चा कोणताही कार्यकर्ता अजूनही सावरलेला नाही. मात्र आपल्या स्व.नेत्याने दिलेली जनसेवेची शिकवण लक्षात घेत यावेळी त्यांना अभिवादन ठरेलं असे उपक्रम राबवत यावर्षी वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार रोहा अष्टमी मधील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला आहे. त्यानुसार महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत रायगड जिल्ह्यात प्रथमच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचे नेतृत्वाखाली , नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे सहकार्याने सभापती नीता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के व सर्व महिला नगरसेविका यांचे संकल्पनेतू सुदर्शन कंपनी च्या सी एस आर निधी मधून 7 व 8 जुलै रोजी मोबाईल मेमोग्राफी व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे.या माध्यमातून महिलांचे मधील स्तन, गर्भाषय, मुख कॅन्सर याविषयी जनजागृती व तपासणी करण्यात येणार आहे. यासोबत महिलांचे मधील उच्च रक्तदाब, मधुमेह, ऍनिमया(रक्तक्षय ) यांचीही तपासणी या वेळी करण्यात येणार आहे. यासोबत रोहा अष्टमी मधील शालेय विद्यार्थी व नागरिकांचे साठी डॉ. सी डी. देशमुख विद्यासंकुल येथे स्व. अजितदादा पवार क्रीडा नगरी उभारून मैदानी व बैठे खेळांचा क्रीडा महोत्सव होणार आहे. आजकाल पाश्चात खाद्य पदार्थ यांचा रोजच्या खाण्यात वाढ होत आहे मात्र यामुळे शरीराला पोषक अन्न घटक उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक व्याधीना सामोरे जावे लागत आहे. हे ओळखून शरीराला पोषक तत्वे देणारे खाद्य पदार्थ पाक कला स्पर्धा महिला व बालकल्याण समिती च्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शहरातील दोन अपंग व्यक्ती ना त्यांचे उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यासोबतच शहरातील रिक्षा चालकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी दोन कुलर ही देण्यात येणार आहेत.यासर्व उपक्रमात रोहा अष्टमी शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोहा अष्टमी शहर राष्ट्रवादी च्या वतीने करण्यात आले आहे.
