१ मे २०२६ पासून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारीडॉ. नरेंद्र काळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दंत परिषद) यांची माहिती:
(प्रतिनिधी : पांडुरंग पाटील)मुंबई : महाराष्ट्र राज्य दंत परिषद (MSDC) यांनी राज्यातील दंतवैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व व नियामक अनुपालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने “नो युअर डेंटल प्रॅक्टिशनर (KYD)” हा उपक्रम औपचारिकरीत्या अंमलात आणला आहे. सदर उपक्रमाचा मुख्य हेतू राज्यात बेकायदेशीर, अप्रमाणित व नोंदणीविना चालणाऱ्या दंतप्रॅक्टिसला आळा घालणे हा आहे.उक्त उपक्रमांतर्गत परिषदेमार्फत प्रत्येक नोंदणीकृत दंतचिकित्सकास एक अधिकृत KYD शीट प्रदान करण्यात येत आहे. सदर शीटवर समाविष्ट असलेल्या अद्वितीय QR कोडद्वारे सर्वसामान्य नागरिक, रुग्ण व संबंधितांना दंतचिकित्सकाची नोंदणी स्थिती, वैधता, स्पेशालिटी व इतर आवश्यक तपशील त्वरित व विश्वसनीय पद्धतीने पडताळता येतील.यामुळे रुग्णांना उपचारासंदर्भात माहितीआधारित निर्णय घेणे सुलभ होऊन दंतसेवांबाबतचा सार्वजनिक विश्वास अधिक दृढ होईल. तसेच बोगस दंतवैद्य शोधणे सोपे होईल. परिषदेकडून सर्व नोंदणीकृत दंतचिकित्सकांना निर्देश देण्यात येत आहेत की, सदर KYD QR शीट त्यांच्या दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर अथवा प्रतीक्षागृहात स्पष्टपणे व ठळकपणे प्रदर्शित करावी.महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी नमूद केले आहे की, सदर उपक्रम हा सार्वजनिक हितसुरक्षेसाठी, दंतव्यवसायातील शुचित्व राखण्यासाठी तसेच व्यावसायिक प्रतिष्ठा व विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासोबतच, परिषदेमार्फत दिनांक १ मे २०२६ पासून इंग्रजीसह मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांचे हस्ते या नवीन नोंदणी प्रमाणपत्राचे विमोचन करण्यात आले तसेच ‘Handbook of Practitioners guidelines’ या महाराष्ट्र स्टेट डेंटल कॉन्सिल च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. राज्यात हा असा उपक्रम करणारी स्टेट डेंटल कॉन्सिल ही पहिली वैद्यकीय परीषद आहे.या पुस्तिकेत दंतवैद्यक व्यावसाय (Dental practice) करणाऱ्या डॉक्टरांसाठी उपयुक्त माहिती आहे. यामध्ये सध्याचे दंतवैद्यक व्यवसाया संदर्भातील कायदे, नैतिक आचरण, क्लिनिक सुरू करताना आवश्यक कागदपत्रे व परवानगी, रुग्णांची माहिती, संमती पत्र, आपत्कालीन व्यवस्थापन, औषधींचा वापर, आदर्श प्रिस्क्रीप्शन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम इत्यादी सर्व माहिती उपलब्ध आहे.सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व नोंदणीकृत दंतचिकित्सकांनी पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित असून, त्याद्वारे दंतवैद्यकीय क्षेत्रात पारदर्शक, उत्तरदायी व कायदेशीर चौकटीत कार्यरत व्यवस्था अधिक बळकट होईल. महाराष्ट्र राज्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री .हसन मुश्रीफ साहेब यांचे हस्ते या नवीन नोंदणी प्रमाणपत्राचे विमोचन करण्यात आले . तसेच handbook of Practitioners guidelines या महाराष्ट्र स्टेट डेंटल कॉन्सिल च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. राज्यात हा असा उपक्रम करणारी स्टेट ठेंटन कॉन्सिल ही पहिली वैद्यकीय परीषद आहे. या पुस्तिकेत दंतवैद्यक व्यावसाय (Dental Practice) करणाऱ्या डॉक्टरांसाठी उपयुक्त माहिती आहे. सध्या चे दंतवैद्यक व्यावसाया संदर्भातील कायदे , नैतिक आचरण ,क्लिनिक सुरू करताना आवश्यक कागदपत्रे व परवानगी , रुग्णांची माहिती ,संमती पत्र ,आपत्कालीन व्यवस्थापन ,औषधी चा वापर ,आदर्श प्रिस्क्रीप्शन , प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम , इ.सह सर्व आवश्यक व गरजेची माहिती एकाच पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
